बुलडाणा लाइव्ह चा जगभरात डंका! ९२ देशांतील बुलडाणेकर वाचतात बुलडाणा लाइव्ह! जिल्ह्याच्या १४४४ गावांत पोहचले बुलडाणा लाइव्ह! वाचकसंख्येचा आकडा पोहचला दिवसाला ४ लाखांवर...
Jan 17, 2024, 10:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निर्भिड..निःपक्ष.... अन् प्रामाणिकपणा...या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करणाऱ्या बुलडाणा लाइव्हची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ताज्या बातम्या सर्वात आधी वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बुलडाणा लाइव्ह ची वाचकसंख्या आता दिवसाला ४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. जगभरातील ९२ देशांतील बुलडाणेकर बुलडाणा लाइव्ह शी जोडल्या गेल्याचे गुगल ॲनेलिटीक्स चा रिपोर्ट सांगतो.
गुगल ॲनेलिटीक्स च्या रिपोर्ट नुसार बुलडाणा लाइव्ह आता जगभरातील ९२ देशांत पोहचले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १४४४ पैकी १४४४ गावांत बुलडाणा लाइव्ह चे प्रतिनिधी नेमण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठी तब्बल साडेपाच हजार अर्ज बुलडाणा लाइव्ह कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
कोरोना काळात जेव्हा वृत्तपत्रे वितरणाची व्यवस्था कोलमडली होती तेव्हा सुरू झालेल्या बुलडाणा लाइव्ह ने अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. जिल्ह्यातील ताज्या बातम्या, घटना घडामोडी, निर्भिड राजकीय विश्लेषण आणि सत्य छापण्याची हिम्मत यामुळे बुलडाणा लाइव्ह ने वाचकांच्या मनात स्थान मिळवले. आजघडीला जिल्ह्यात असे एकही गाव नाही जिथे बुलडाणा लाइव्ह चे वाचक नाहीत.
आंतरराष्ट्रीय कंपन्या झाल्यात जाहिरात पार्टनर..
बुलडाणा लाइव्ह शी लोकप्रियता पाहून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्यांनी बुलडाणा लाइव्ह सोबत व्यावसायिक करार केले आहेत. ज्यात MGID, ऍडझेब्रा, कोलंबिया ऑनलाईन या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे..