BREAKING गुलाबराव खरात बुलडाणा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी!

 
जदजग
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा परिषदेचे नवे काय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज गुलाबराव खरात यांची नियुक्ती करण्यात आली. कुलदीप जंगम यांची बदली झाल्यानंतर बी.मोहन यांच्याकडे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार होता.आता ,आज ५ सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही.राधा यांच्या स्वाक्षरीने  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी गुलाबराव खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरात याआधी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम सांभाळत होते. ७ सप्टेंबरला ते बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेण्याची शक्यता आहे.