शेतरस्त्यावरील निवासी अतिक्रमण हटवून दुसरे अतिक्रमण थाटल्याची तक्रार; किन्होळा येथील प्रकार
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतरस्त्याच्या नावाखाली निवासी अतिक्रमण हटवून तिथे अतिक्रमण केले जात असल्याची तक्रार अनिल साहेबराव चिंचोले यांनी तहसीलदारांकडे केली आहे. किन्होळा (ता. चिखली) येथे हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी म्हटले असून, सचिन आत्माराम बाहेकर यांच्यावर आरोप केले आहेत. निवेदनात म्हटले आहे, की सचिन बाहेकर यांनी दत्तात्रय बराटे, राजेंद्र बराटे, सिद्धेश्वर जाधव, शेख …
Mar 18, 2021, 17:12 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतरस्त्याच्या नावाखाली निवासी अतिक्रमण हटवून तिथे अतिक्रमण केले जात असल्याची तक्रार अनिल साहेबराव चिंचोले यांनी तहसीलदारांकडे केली आहे. किन्होळा (ता. चिखली) येथे हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी म्हटले असून, सचिन आत्माराम बाहेकर यांच्यावर आरोप केले आहेत. निवेदनात म्हटले आहे, की सचिन बाहेकर यांनी दत्तात्रय बराटे, राजेंद्र बराटे, सिद्धेश्वर जाधव, शेख अयब शेख आब्दर यांच्या मदतीने जप्त केलेल्या मुरुमावर ताबा केला असून, त्याला तार कपाऊंड घालण्यात येत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.