मेहकर ः महावितरण कर्मचार्यांनी धावून थांबवले तारांचे स्पार्किंग!; बुलडाणा लाइव्ह इफेक्ट
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोमेधर (ता. मेहकर) येथील मंदिरासमोरील खांबावर नेहमी तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता होती. याबाबत बुलडाणा लाइव्हने वृत्त प्रसिद्ध करताच महावितरणच्या कर्मचार्यांनी तातडीने धाव घेऊन दुरुस्तीचे काम केले. दोन महिन्यांपूर्वी सुमित प्रकाश चव्हाण या मुलाचा तारेला स्पर्श होऊन अपघात घडला होता. दिवसभर चूर …
Jan 4, 2021, 13:41 IST
मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोमेधर (ता. मेहकर) येथील मंदिरासमोरील खांबावर नेहमी तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता होती. याबाबत बुलडाणा लाइव्हने वृत्त प्रसिद्ध करताच महावितरणच्या कर्मचार्यांनी तातडीने धाव घेऊन दुरुस्तीचे काम केले. दोन महिन्यांपूर्वी सुमित प्रकाश चव्हाण या मुलाचा तारेला स्पर्श होऊन अपघात घडला होता. दिवसभर चूर चूर होऊन तार तुटण्याची शक्यता होती. ही तार तुटून कुणाच्या अंगावर पडली तर जीवही जाऊ शकत होता. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून बुलडाणा लाइव्हने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच महावितरणच्या कर्मचार्यांनी दुरुस्ती काम हाती घेत होणारे स्पार्किंग थांबवले आहे.