कै.कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालयाला पालकमंत्री डॉ. शिंगणे यांची भेट
लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अमृत सेवाभावी संस्था परभणी द्वारा संचालित कै. कमलाबाई बनमेरू कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या (मेहकर रोड लोणार) नवीन जागेत पालकमंत्री तथा अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, राजूभाऊ इंगळे, किशोरभाऊ मापारी, विठ्ठल गायकवाड (अध्यक्ष शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र भारत अभियान) व इतर मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे स्वागत कै. कु. दुर्गा बनमेरू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी केले तसेच अॅड. नाझेर काझी व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव डॉक्टर संतोष बनमेरू यांनी केले. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी महाविद्यालयाच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम हे भव्य असून सर्व भौतिक सुविधा व सुसज्ज प्रयोगशाळा आहे, असे गौरवोद्गार काढत संस्थेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्रा. कमलाकर वाव्हाळ, डॉक्टर मंगेश ठोबळ, रमेश बनमेरू, किरण काळे, रमेश मापारी, श्री. यमलवाड, शिवाजी पांडे, गजानन सोनवणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.