मेहकर ः …तर घडू शकतो मोठा अपघात!

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील गोमेधर मंदिरासमोरील खांबावर नेहमी तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या कर्मचार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोन महिन्यांपूर्वी सुमित प्रकाश चव्हाण या मुलाचा तारेला स्पर्श होऊन अपघात घडला होता. दिवसभर चूर चूर होऊन तार तुटण्याची शक्यता नाकारता येत …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  तालुक्यातील गोमेधर मंदिरासमोरील खांबावर नेहमी तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोन महिन्यांपूर्वी सुमित प्रकाश चव्हाण या मुलाचा तारेला स्पर्श होऊन अपघात घडला होता.  दिवसभर चूर चूर होऊन तार तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तार तुटून कुणाच्या अंगावर पडली तर जीवही जाऊ शकतो.