जिथे गर्भवती- नवजात बालकांना लस देतात तिथेच कोरोना लसीकरण केंद्र; संसर्गाची भीती, सिंदखेड राजातील प्रकार महात्मा फुले समता परिषदेने आणला समोर

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिथे गर्भवती- नवजात बालकांना लस देतात तिथेच कोरोना लसीकरण केंद्र असल्याने संसर्गाची भीती नाकारता येत नाही. हा सिंदखेड राजातील प्रकार महात्मा फुले समता परिषदेने समोर असून, तशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांमार्फत केली आहे. तालुकाध्यक्ष संदीप मेहेत्रे यांनी निवेदनात म्हटले आहे, की सिंदखेड राजा येथील लसीकरण सध्या ग्रामीण …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिथे गर्भवती- नवजात बालकांना लस देतात तिथेच कोरोना लसीकरण केंद्र असल्याने संसर्गाची भीती नाकारता येत नाही. हा सिंदखेड राजातील प्रकार महात्मा फुले समता परिषदेने समोर असून, तशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांमार्फत केली आहे.

तालुकाध्यक्ष संदीप मेहेत्रे यांनी निवेदनात म्‍हटले आहे, की सिंदखेड राजा येथील लसीकरण सध्या ग्रामीण रुग्णालयात होत आहे. येथे नियमित ओपीडीत गर्भवती मातांचे, नवजात बालकांचे लसीकरण केले जाते. याच परिसरात कोरोनावरील लस घेण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची नवजात बालके, स्तनदा मातांना त्यांचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने हा धोका टाळण्यासाठी सिंदखेड राजा येथील नगरपालिकेच्या टाऊन हॉल परिसरात स्वातंत्र लसीकरण केंद्र स्थापण्याचे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावे, अशी विनंती निवेदनात केली आहे.

सध्या लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य सेतू व कोविन ॲपवरून केवळ रजिस्ट्रेशन केल्यानंतर आधार नंबरच्या आधारे प्रत्येक केंद्रावर लस दिली जात होती. मात्र आता ॲपवर रजिस्ट्रेशनसह तारखेची निश्चिती करूनच लस घ्यावी लागत आहे. लसीकरणासाठी  घातलेल्या या अटीमुळे सामान्य लोकांना लस घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. अॅपवरील रजिस्ट्रेशन होते परंतु तारीख व वेळेची निश्चिती करून घेण्यात मोठी अडचण होत आहे. सर्व लसीकरण केंद्रावर पूर्वीप्रमाणे केवळ ॲपवरील रजिस्ट्रेशन वरून लसीकरण करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे.