‘स्‍वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांचा गर्भित इशारा : वीज कनेक्शन कापाल तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना फटके देऊ!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ‘वीज कनेक्शन कापाल तर याद राखा, जबरदस्ती वीजबिल वसूल करायचा प्रयत्न कराल तर अधिकारी , कर्मचाऱ्यांना फटके देऊ, असा गर्भित इशारा वीज महावितरण कंपनीला देतानाच, नागरिकांनाे कुणीही आले तर लगेच आम्हाला कळवा आम्ही १० मिनिटांत तिथे पोहोचू, असे आवाहन आज, 25 फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ‘वीज कनेक्शन कापाल तर याद राखा, जबरदस्ती वीजबिल वसूल करायचा प्रयत्न कराल तर अधिकारी , कर्मचाऱ्यांना फटके देऊ, असा गर्भित इशारा वीज महावितरण कंपनीला देतानाच, नागरिकांनाे कुणीही आले तर लगेच आम्‍हाला कळवा आम्‍ही १० मिनिटांत तिथे पोहोचू, असे आवाहन आज, 25 फेब्रुवारीला स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.

श्री. तुपकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांची भेट घेऊन सामान्‍य नागरिक, शेतकऱ्यांच्‍या अडचणी सांगितल्‍या आणि यापुढे वीज कनेक्‍शन कापाल तर संघर्ष छेडू, असा इशाराही दिला. महावितरणने सध्या विज कनेक्शन कापण्याचा सपाट लावला असून, लॉकडाऊन काळातील विजबील माफ करायचे सोडून सध्या जबरदस्ती वसुली सुरू आहे. ऊर्जामंत्र्यांनी पहिले विजबिल माफीचे सुतोवाच केले व नंतर घुमजाव केले. आता जबरदस्ती वसुली सुरू आहे. हे कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे श्री. तुपकर यावेळी म्‍हणाले. सध्या जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन आहे तर विजबिले भरणार कशी..? यापुढे कुणीही विज कनेक्शन कापायला अधिकारी – कर्मचारी आला तर ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा,असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.