शेतकऱ्यांना तत्काळ ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या; डॉ. सुनील कायंदे यांची मागणी
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई द्या, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की मूग सोयाबीन, कपाशी, मका ही पिके हातातून गेली …
Oct 3, 2021, 18:33 IST
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई द्या, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की मूग सोयाबीन, कपाशी, मका ही पिके हातातून गेली आहेत. फळबागेचेही मोठे नुकसान झाले आहेत. अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटून तसेच नदी काठचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्तरित्या तत्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत म्हणून जाहीर करावी. जिल्ह्यात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.