प्रीतमताईंना डावलल्याचे पडसाद जिल्ह्यातही; समर्थकांची खदखद येतेय समोर!, राजीनामासत्र सुरू

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रीतमताई मुंडे यांना मंत्रिपदासाठी डावलल्याने जिल्ह्यात पंकजाताई मुंडे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी संतप्त झाले आहेत. त्यांच्या मनातील खदखद लवकरच राजीनामासत्रातून दिसणार असून, याचा श्रीगणेशा सिंदखेड राजातून झाला आहे. जिल्हा सरचिटणीस डॉ. गणेश मांटे यांच्याकडे गजानन मुंढे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. ते सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ भारतीय …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रीतमताई मुंडे यांना मंत्रिपदासाठी डावलल्याने जिल्ह्यात पंकजाताई मुंडे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी संतप्‍त झाले आहेत. त्‍यांच्‍या मनातील खदखद लवकरच राजीनामासत्रातून दिसणार असून, याचा श्रीगणेशा सिंदखेड राजातून झाला आहे. जिल्हा सरचिटणीस डॉ. गणेश मांटे यांच्‍याकडे गजानन मुंढे यांनी सदस्यत्‍वाचा राजीनामा पाठवला आहे. ते सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता युवा मोर्चाचे संपर्कप्रमुख होते.

गोपीनाथ मुंडे यांनी राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्‍या भाजपातूनच आता त्‍यांच्‍या लेकींनाच बेदखल करण्याचे काम सुरू आहे. पक्षाच्‍या वरिष्ठांकडून पंकजाताई आणि प्रीतमताई यांच्‍या बाबत आकस ठेवला जात असल्याचा आरोप समर्थक करत आहेत. त्‍यांना मिळणारी पक्षीय वागणूक मनाला क्लेशदायी असल्याचे समर्थकांचे म्‍हणणे आहे. निष्ठावंतांना हिनतेची वागणूक देणे, मतदारसंघातील काही नेत्यांनीच शत्रूशी मनसबदारी करणे पसंद केल्याने डोळ्यांदेखत हे सर्व चित्र बघावे वाटत नाही म्हणून मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्‍न केल्याचे गजानन मुंढे यांनी राजीनाम्यात म्‍हटले आहे.