अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री शिंगणे यांचे आदेश

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सोमवार व आज मंगळवारी अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्याच्या 9 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश …
 
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री शिंगणे यांचे आदेश

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सोमवार व आज मंगळवारी अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्याच्या 9 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील पैनगंगासह अन्य नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काही गावे बाधीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी. जेणेकरून पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे करतील व शेतकऱ्यांना मदत देतील. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीला द्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.