भगवे वादळ आता बुलडाणा तालुक्यात घोंगावणार! आजपासून मशाल यात्रा बुलडाणा तालुक्यात; तराडखेड मधून प्रारंभ; येळगाव, सव , रुईखेड टेकाळे येथे सायंकाळी कॉर्नर सभा...

 
Budhvat
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात निघालेली मशाल जागर यात्रा सुपरहिट ठरत आहे. ५ सप्टेंबरपासून निघालेल्या या यात्रेने आतापर्यंत मोताळा तालुक्यातील १०० गावांचा प्रवास केला आहे. आता,आज१३ सप्टेंबरपासून ही यात्रा बुलडाणा तालुक्यात येत असून सकाळी तराडखेड येथून यात्रेला प्रारंभ होत आहे.
शेतकरी कर्ज मुक्ती, पीक विमा, जंगली जनावरांपासून पिकांचे रक्षण, घरकुलांचे अनुदान यासह विविध जनहिताच्या मुद्यांवर ही मशाल यात्रा बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निघालेली आहे. या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. २२ सप्टेंबर पर्यंत बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील १५१ गावांत ही यात्रा जाणार असून २३ सप्टेंबरला बुलडाणा येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाने या मशाल यात्रेचा समारोप होणार आहे. 
 
आजचा प्रवास असा...
मशाल यात्रा आजपासून बुलडाणा तालुक्यातील गावांत जाणार आहे. तराडखेड येथून प्रारंभ झाल्यानंतर ८.३० वाजता गुम्मी, ९ वाजता मढ, ९.४५ वाजता जनुना, १०.१५ वाजता गोंधनखेड, ११ वाजता चौथा, ११.२० वाजता गिरडा, १२ वाजता पाडळी, १२.३० वाजता पळसखेड नागो, १ वाजता दहिद बु, १.२० वाजता दत्तपुर, ३.३० वाजता बिरसिंगपूर, ४ वाजता जांभरून, ४.३० वाजता येळगाव, ५ वाजता सव, ५.३० वाजता खूपगाव, ६ वाजता रुईखेड टेकाळे आणि सायंकाळी ६.३० वाजता खेर्डी असा यात्रेचा आजचा प्रवास राहणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले आहे.