"हिंदुराष्ट्र सेना" राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार परिवारातील संघटन नाही! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण; चुकीच्या बातम्यांना बळी न पडण्याचे आवाहन....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "हिंदुराष्ट्र सेना" राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार परिवारातील संघटन नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. काही प्रसार माध्यमांमध्ये "हिंदूराष्ट्र सेना" हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित असल्याच्या बातम्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसारित झाल्या होत्या. मात्र चुकीच्या बातम्या व कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आले आहे.संघ स्वयंसेवक राष्ट्रहितासाठी १०० टक्के मतदानाचा आग्रह धरणार असल्याचेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलडाणा जिल्ह्याच्या प्रचार विभागाने कळविले आहे...