...तर आ. महाले पाटील स्वतः जोडणार वीज!
Dec 1, 2021, 19:44 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रास्ता रोको आंदोलनात दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे तोडलेले वीज कनेक्शन तातडीने जोडून द्या अन्यथा स्वतः जोडणी करणार असल्याचा गंभीर इशारा चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे.
२९ नोव्हेंबरला आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखलीत चार तास रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी 'तोडलेली वीज तीन दिवसांत जोडणार आणि नव्याने तोडणी करणार नाही' असे लेखी दिले होते. आता चिखली विधानसभा मतदारसंघात वीज जोडणी न केल्यास आ. महाले पाटील यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः वीज जोडणीचा निर्णय घेतला आहे. हे करताना काही अनुचित घटना घडल्यास त्यास पूर्णतः विज वितरण कंपनीच जबाबदार राहील. जीवित, आर्थिक हानी झाल्यास विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरू, असेही आ. महाले पाटील यांनी म्हटले आहे.