सिद्धार्थ खरातांपुढे डझनभर अडचणी; आता मेळ कसा जमणार? लक्ष्मण घुमरे, डॉ.गोपाल बच्छीरेंची बंडखोरी..!

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठा शिवसेनेने निष्ठावंत शिवसैनिकाऐवजी ऐनवेळी पक्षात आलेल्या सिद्धार्थ खरातांना उमेदवारी दिल्याने शेकडो शिवसैनिक नाराज आहेत. काहींनी तर थेट बंड पुकारात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने देखील बंड पुकारले असून काँग्रेस नेते लक्ष्मण घुमरे उद्या,२९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..एकंदरीत उबाठा शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्यापुढे डझनभर अडचणी उभ्या राहिल्या आहेत..त्यामुळे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले सिद्धार्थ खरात यांचा मेळ कसा जमणार?असा सवाल खुद्द खरात यांच्या समर्थकांनाही पडला आहे... 

 

 

 

दोन महिन्याआधी आमदार होण्याच्या महत्त्वकांक्षेने खरात यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. केवळ "आर्थिक सक्षम" या एका निकषावर त्यांनी उमेदवारी देखील मिळवली असा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत. मात्र त्यामुळे आता कित्येक वर्षांपासून शिवसेनेसाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर तर अनेक शिवसैनिकांनी "आम्ही खरातांचे काम करणार नाही" अशा पोस्ट करीत खरात यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छीरे यांनी तर खरात यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. खरात हा आमदारांचा खुफिया माणूस आहे असा निशाणा बच्छीरे यांनी लगावला आहे.

बच्छीरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील खरात यांच्या विरोधात मोहीम उघडली असून ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे खरात यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत...आज सिद्धार्थ खरात उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत..मात्र पुरेशा गर्दी अभावी आजचा "फ्लॉप शो" होण्याचीच जास्त शक्यता आहे..