धक्कादायक ब्रेकिंग! ओबीसींच्या आरक्षणावर "सर्वोच्च' गंडांतर!!
घटनाकारांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अर्थात 6 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशात निवडणुकांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (खुल्या) जागासाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू ठेवून पूर्ण करण्यात यावी. या आदेशाला अनुसरून राज्य आयोगाने, यापूर्वी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठीच्या जागांची निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित केली आहे. या स्थगित निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
यावर होणार परिणाम...
दरम्यान, जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास, 123 ग्रामपंचायतींच्या रिक्त 166 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यातील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक आता स्थगित होणार आहे. 17 सदस्यीय संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीची निवडणूक सुद्धा 21 डिसेंबर रोजीच आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 4 जागा मिळून एकूण 8 जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता तेथील निवडणूक स्थगित होणार आहे.