मंत्री गिरीश महाजन आज बुलडाण्यात! वाचा कसा आहे दौरा..
Jun 5, 2023, 11:30 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज ,वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन आज, ५ जूनला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
जामनेर वरून गिरीश महाजन ते बुलडाण्याला येणार आहेत. दुपारी सव्वा दोनला ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर साडेतीनला ते जामनेरकडे रवाना होतील.