प्रवीण तोगडियांशी LIVE संवाद!; म्हणाले, मोदींची दोस्ती खुर्चीसोबत...

RSS बद्दल केले मोठे विधान!!
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आज, ८ डिसेंबरला बुलडाण्यात होते. राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर भाजपाच्या एका नेत्याच्या घरी त्‍यांनी चहापान केले. याच ठिकाणी बुलडाणा लाइव्हने त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

यावेळी श्री. तोगडिया म्‍हणाले, की मोदींनी तीन काळे कृषी कायदे आधीच रद्द केले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. १ लाख मराठा सैनिकांच्या कत्तली करणाऱ्या अहमदशहा अब्दालीचा गौरव वाढविणाऱ्या अफगाणिस्तानच्या संसदेला भारत सरकार ५ हजार कोटी रुपये देऊ शकते तर ७०० शेतकऱ्यांना प्रत्येकी १ कोटीची मदत देण्यास काय अडचण आहे? ७०० कोटी तुम्हाला कुठे स्वतःच्या खिशातून द्यायचेत? आमच्या टॅक्समधून शेतकऱ्यांना मदत द्या, असे ते म्हणाले.

मोदी तुमचे मित्र आहेत, त्‍यांच्याशी थेट का बोलत नाहीत? असे विचारले असता ते म्हणाले की, सत्तेत गेल्यानंतर कोणी मित्र राहत नाही. त्यांची दोस्ती खुर्चीसोबत आहेत. ते २५ एकराच्या बंगल्यात राहतात. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मोदी हे इम्रान खानशी बोलू शकतात पण माझ्याशी नाही, असे तोगडिया म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या संबंधावरही भाष्य केले... पहा मुलाखतीचा व्हिडिओ ः