विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज आणि उद्या बुलडाण्यात, काँग्रेसला बळकट करणार...

 
Vijay
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आज,१२ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Bhutekar
Advt 👆
त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. वडेट्टीवार यांचे आज सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. त्यानंतर मंगळवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला शहर व अकोला ग्रामीण, बुलडाणा आणि वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या एकत्रित बैठकीस उपस्थित राहतील. उद्या सायंकाळी पाच वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहातून अमरावतीकडे प्रयाण करतील.