ग्रा. पं. पोटनिवडणूक ः जिल्ह्यात ३३ मतदान केंद्र सज्ज
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी तेराही तालुक्यात 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक 123 ग्रामपचांयतींच्या 166 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे. निवडणुकीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी सुरू होण्याची वेळ 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता असणार आहे.
मतमोजणीचे तालुकानिहाय ठिकाण
बुलडाणा तहसील कार्यालय, चिखली तहसील कार्यालय, सिंदखेड राजा तहसील कार्यालय, लोणार तहसील कार्यालय, मेहकर तहसील कार्यालय, मोताळा तहसील कार्यालय, खामगाव तहसील कार्यालय, शेगाव तहसील कार्यालय, संग्रामपूर तहसील कार्यालय, नांदुरा : पंचायत समिती येथील कक्ष क्रमांक १ समोरील खोली, देऊळगाव राजा तहसील कार्यालय, जळगाव जामोद तहसील कार्यालय, मलकापूर तहसील कार्यालय.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या व रिक्त पदे
बुलडाणा ः ग्रा. पं. संख्या 2 व रिक्त पदे 2, चिखली : ग्रा. पं. संख्या 11 व रिक्त पदे 15, देऊळगाव राजा : ग्रा. पं. संख्या 5 व रिक्त पदे 6, सिंदखेड राजा : ग्रा. पं. संख्या 4 व रिक्त पदे 4, मेहकर : ग्रा. पं. संख्या 17 व रिक्त पदे 32, लोणार : ग्रा. पं. संख्या 8 व रिक्त पदे 8, खामगाव : ग्रा. पं. संख्या 15 व रिक्त पदे 22, शेगाव : ग्रा. पं. संख्या 7 व रिक्त पदे 7, जळगाव जामोद : ग्रा. पं. संख्या 8 व रिक्त पदे 14, संग्रामपूर : ग्रा. पं. संख्या 7 व रिक्त पदे 10, मलकापूर : ग्रा. पं. संख्या 12 व रिक्त पदे 13, नांदुरा : ग्रा. पं. संख्या 13 व रिक्त पदे 18, मोताळा : ग्रा. पं. संख्या 14 व रिक्त पदे 15.