BIG BREAKING सिंदखेडराजात महायुतीत "मैत्रीपूर्ण" लढत! शिंदेंच्या शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे रिंगणात कायम! राजेंद्र शिंगणेंसोबत होणार मुकाबला...
Nov 4, 2024, 15:09 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आता अखेर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झाले आहे. इथे शिंदेंच्या शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना उमेदवार दिल्यानंतर एका रात्रीतून मनोज कायंदे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघासंदर्भात चर्चा सुरू होती.. दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती..मात्र दुपारी ३ पर्यंत दोघांपैकी एकानेही अर्ज मागे घेतला नसल्याने आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे...
मनोज कायंदे विरुद्ध डॉ शशिकांत खेडेकर विरुद्ध डॉ.राजेंद्र शिंगणे अशी ही लढत होणार आहे. मनोज कायंदे यांच्या उमेदवारीचा फटका कुणाला बसतो? हे २३ नोव्हेंबरला निकालाअंती कळणार आहे....
चिखलीतून कुणाल गायकवाड यांची माघार...
चिखली विधानसभा मतदारसंघातून कुणाल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तिकडे मेहकरात लक्ष्मण घुमरे व डॉ.गोपाल बच्छीरे यांनी देखील आपापली उमेदवारी मागे घेतली आहे. मलकापुरातील ॲड. हरीश रावळ यांनी माघार घेतली आहे...