शेतकऱ्यांना फसवणाऱ्या देऊळघाटच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल! सोयाबीन,तुर,हरभर खरेदी करून पैसेच देत नव्हता..
Aug 2, 2024, 17:45 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) तालुक्यातील राजूर गावातील शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांच्या शेत मालाची खरेदी करून दोन ते तीन वर्षांपासून लाखो रुपये थकवणाऱ्या देऊळघाटच्या अ.लतीफ अ. अजीज या व्यापाऱ्यावर अखेर अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी यांच्या आदेशाने बोरखेडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आली आहे
दोन ते तीन वर्षे अगोदर पासून सोयाबीन,तूर व हरभरा खरेदी केल्यानंतर वारंवार पैश्याची मागणी केल्यानंतर लाखों रुपये दिले नाही. पैसे न देता आमची फसवणूक केल्याच्या तक्रारी राजूरचे शेतकरी लक्ष्मण राघो वाघ,उखर्डा भागाची वाघ,शेख.जावेद शेख शौकत,शेख.अमजद शेख.मोहम्मद,रईस खान हबीब खान व शेख.फारुख शेख.मुनीर यांनी 2 जुलै रोजी बोरखेडी पोलिसात केली होती, मात्र ठाणेदार सारंग नवलकर आणि बिट जमादार कपिल काशपाग यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी यांनी आदेश देताच बोरखेडी पोलीस ठाण्यात व्यापारी अ.लतीफ यांच्या विरुद्ध कलम 406,420 भारतीय दंड संहिता नुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.