मतमोजणी अपडेट! विजयी कोटा गाठण्यासाठी लिंगाडेंना ३४५० मतांची गरज..! रणजित पाटलांना अजूनही संधी, कसे ते वाचा! आकड्यांचा खेळ समजून घ्या...
सध्या अमरावती बडनेरा रोडवरील गोडावून मध्ये मतांची मोजणी सुरू आहे. दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू असताना शेवटचे १३ उमेदवार बाद झाले तेव्हा लिंगाडे यांना ४३५६१ तर रणजित पाटील यांना ४१ २७७ इतकी मते आहेत. विजयी कोटा पूर्ण करण्यासाठी धिरज लिंगाडे यांना ३४५० तर रणजित पाटील यांना ५८२४ मते आवश्यक आहेत.
कसा आहे आकड्यांचा खेळ?...
दरम्यान धिरज लिंगाडे आणि रणजित पाटील वगळता अजूनही ८ उमेदवारांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी बाकी आहे. या आठ उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांची बेरीज ९११७ एवढी आहे. यात वंचितचे अनिल अंमलकार यांच्या ४१८८, डॉ.प्रवीण चौधरी यांच्या १६९५ व शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांच्या १५४२ मतांचा समावेश आहे.
त्यामुळे या उमेदवारांना पहिली पसंती देणाऱ्यांनी दुसरी पसंती कुणाला दिली यावर सारा खेळ अवलंबून असणार आहे. या उमेदवारांची मोजणी होऊनही जर आवश्यक कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.सध्यस्थितीत भाजपचे रणजित पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत धिरज लिंगाडे यांचा विजयाचा मार्ग सोपा होईल. मात्र अनिल अंमलकार यांच्या मतांची मोजणी होईपर्यंत जर रणजित पाटील पहिल्या क्रंमाकावर पोहचले तर धिरज लिंगाडे यांना मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते मोजल्या जाईल..असे झाले तर चमत्कारिक रित्या रणजित पाटील जिंकू शकतात...अर्थात हे सगळे जर तर वर अवलंबून आहे.