मित्रपक्षांमुळेच काँग्रेसचे नुकसान; म्हणून स्वबळ!
शेगावमध्ये नानांचा पुन्हा नारा
Nov 9, 2021, 09:41 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मित्रपक्षांमुळेच काँग्रेसचे नुकसान होत असल्याचा आरोप करत यापुढील निवडणुका स्वबळावर लढण्यात येतील, असा नारा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिला आहे. आघाडीत बंडखोरी वाढते. त्याचा फायदा विरोधकांना होतो. यात निष्ठावंत कार्यकर्त्यांवरही अन्याय होतो. त्यामुळे आगामी निवडणुकात स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.
आ. पटोले ७ नोव्हेंबरला शेगावला आले होते. नेते ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले.
काय म्हणाले नाना...
काय म्हणाले नाना...
- पद मिळाल्यानंतर काम न करणे खपवून घेतले जाणार नाही.
- उमेदवारीची शिफारस करणाऱ्याला त्या व्यक्तीला निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार.
- पक्षातील गटबाजी गुंडाळा.
- ज्ञानेश्वर पाटील यांच्या लढवय्येपणाची जाणीव पक्ष ठेवेल.