चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, त्‍यांचे पती कुणाल बोंद्रेंची भाजपातून हकालपट्टी!; या दाम्‍पत्‍याच्‍या गैरव्यवहारामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा ठपका!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांना आज, २० ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षाने अखेर पक्षातून निलंबित केले. शहराध्यक्ष पंडित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निलंबनाची घोषणा केली. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्ता यांच्या गुप्ता गार्डन या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला श्री. गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष …
 
चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, त्‍यांचे पती कुणाल बोंद्रेंची भाजपातून हकालपट्टी!; या दाम्‍पत्‍याच्‍या गैरव्यवहारामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा ठपका!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांना आज, २० ऑक्‍टोबरला भारतीय जनता पक्षाने अखेर पक्षातून निलंबित केले. शहराध्यक्ष पंडित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निलंबनाची घोषणा केली. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्ता यांच्या गुप्ता गार्डन या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला श्री. गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, रामकृष्णदादा शेटे, शिवराज पाटील, नगरसेवक गोविंद देव्हडे यांच्यासह भाजपाचे सर्वच नेते उपस्थित होते.

नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, कुणाला बोंद्रे आणि भाजपात सर्व काही ठीक नसल्याचे वृत्त यापूर्वीच बुलडाणा लाइव्हने दिले होते. प्रिया बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांच्या गैरव्यवहारांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत होती. त्यांना पक्षाने सूचना देऊनही त्यांच्या वागणुकीत बदल होत नव्हता. त्यामुळे भाजप त्यांचे निलंबन करत असल्याची घोषणा भाजपने केली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कुणाल बोंद्रे व प्रिया बोंद्रे पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी प्रिया यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. त्या बहुमताने निवडूनही आल्या होत्या. मात्र काँग्रेसशी जवळीक असल्याने भाजप संघटनेत कुणाल बोंद्रे यांचा निभाव लागत नव्हता. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

पत्रकार परिषद लाइव्ह पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://www.facebook.com/buldanalive