चिखलीत भाजपाकडून कर्नाटकमधील घटनेचा निषेध

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्नाटकमधील बंगळुरूत हिंदुस्‍थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या काँग्रेसचा चमचा असलेल्या माथेफिरूच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. विटंबनेच्या घटनेचा चिखलीत भारतीय जनता पक्षातर्फे आज, २० डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशाप्रकारे तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुधाने अभिषेक करण्यात आला. या वेळी डॉ. प्रतापसिंह राजपूत, हनुमंत भवर, दिलीपसेठ डागा, बळीराम काळे, गोविंद देव्हडे, अंकुश तायडे, सागर पुरोहित, संतोष काळे पाटील, सचिन कोकाटे, युवराज भुसारी, विजय वाळेकर, विजय खरे, चेतन देशमुख, कैलास घाडगे, शैलेश सोनुने, दीपक मुरकुटे, गोपाल वाळेकर, सिद्धेश्वर ठेंग, आकाश चुनवाले, यश टिपरे, शुभम कबुतरे, राम शिंदे, संदीप सोनटक्के, विजय पाटील आदींची उपस्‍थिती होती.