मोठी बातमी! मेहकरातून सिद्धार्थ खरातांच्या नावावर शिक्कामोर्तब! उबाठा शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची नावे जाहीर! मेहकरातही निष्ठेच्या पदरी निराशा...
Oct 23, 2024, 19:20 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभेसाठी उबाठा शिवसेनेतर्फे माजी मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या ६५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत खरात यांचे नाव आहे. बुलडाणा विधानसभेसाठी जयश्रीताई शेळके यांना एबी फॉर्म देण्यात आला असला तरी ही यादी दुपारीच फायनल झालेली असल्याने त्या यादीत जयश्रीताई शेळके यांच्या नावाचा समावेश नाही.कारण जयश्रीताई शेळके यांचा प्रवेश थोड्या वेळापूर्वीच झाला आहे..बुलडाणा विधानसभेत जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी मिळाल्याने मेहकर विधानसभेत तरी निष्ठावान आणि जुन्या शिवसैनिकाला उमेदवारी मिळेल अशी आशा शिवसैनिकांना होती मात्र ती फोल ठरली असून अलीकडच्या काळात शिवसेनेत आलेल्या सिद्धार्थ खरात यांनाच उमेदवारी देण्यात आली..