BIG BREAKING पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई! आंदोलन करूच दिले नाही .....

 
बुलढाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आज युवक काँग्रेसच्या वतीने संजय गायकवाड यांच्या निषेधाचे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी आंदोलन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली, जयस्तंभ चौकात तणाव निर्माण झाला. दंगाकाबू पथकासह प्रचंड पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस आंदोलनावर ठाम होती. त्यामुळे पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आली आहे. काँग्रेसला आंदोलन करण्यापासून रोखण्यात आले आहेत. पोलिसांची तानाशाही चालणार नाही अशा घोषणा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत...

 एकतर्फी कारवाईचा काँग्रेसकडून निषेध...

Kayande
Advt.
काँग्रेसने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसचे आंदोलन होऊ देणार नाही अशी भूमिका संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरच एकतर्फी कारवाई केली , यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधून प्रचंड संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत...