अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत सणसणीत चपराक! विधानपरिषद निकालावर भाजप जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकरांची प्रतिक्रिया! आज दुपारी बाराला जिल्हाभर फुटणार फटाके!
काल, २० जून रोजी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पाच पैकी पाचही जागांवर विजय मिळवला. भाजप उमेदवार श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, राम शिंदे आणि प्रविण दरेकर मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत. काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसला स्वतःच्या आमदारांची मते मिळालीच नाहीत याउलट शिवसेनेची अतिरिक्त मते सुद्धा काँग्रेसला मिळाली नाहीत.
दरम्यान हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा, देवेंद्रजींच्या कुशल रणनीतीचा विजय आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत लगावलेली ही सणसणीत चपराक आहे. तब्येत ठीक नसतांना आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी मतदानाला येऊन पक्षनिष्ठा म्हणजे काय असते हे दाखवून दिले त्यामुळे हा विजय त्यांना समर्पित आहे. जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज २१ जून रोजी दुपारी ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष करावा असे आवाहन आकाश फुंडकर यांनी केले आहे.