बुलडाणा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीसाठी ४८ मतदान केंद्रावर मतदान; दुपारी १२ पर्यंत २५.३० टक्के मतदान! दुपारनंतर मतदानासाठी गर्दी वाढायला सुरुवात..!!
Dec 18, 2022, 13:21 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तालुक्यातील १० ग्रामपंचायत मधील ४८ मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी हळूवार का होईना, ११९७ महिला व ११७७ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानाची ९.८२ अशी पहिल्या टप्प्यातील टक्केवारी आहे. दहाही ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद होणार असून, २० डिसेंबरला कुणासाठी मिनी मंत्र्यालयाचे द्वार खुले होते हे कळणार आहे.
दुपारी १२ नंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढायला लागली होती. पहिला व दुसरा टप्पा असे दोन्ही टप्पे मिळून आतापर्यंत महिला ३२०२ व पुरुष ३५७२ मतदारांनी मतदान केले. या मतदानाची २५.३० इतकी टक्केवारी आहे. बुलडाणा तालुक्यात ३० हजार २९९ एकूण मतदार आहेत.बुलडाणा तालुक्यात १० ग्राम पंचायत निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे.
तहसील कार्यालयामार्फत ४८ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर कालच चमु रवाना करण्यात आली होती. प्रत्येक चमूत ४ कर्मचारी १ पोलीस कर्मचारी असे ५ व्यक्ती असून कर्तव्य बजावत आहेत. या सोबतच ५ निवडणूक निर्णय अधिकारी ५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा देखील पुढाकार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला व दुसरा टप्पा मिळवून एकूण २५.३० मतदानाची टक्केवारी असल्याची माहिती नायब तहसीलदार( निवडणूक) प्रफुल्लीता सातपुते यांनी दिली