उद्धव ठाकरे बुलडाण्यात येणार! मेहकरात घेणार सभा; बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिला शब्द

 
बुलडाणा(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आज,१८ ऑक्टोबरला बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना बुलडाणा भेटीचे निमंत्रण दिले. यावर आपण लवकरच बुलडाणा जिल्ह्यात येणार असून मेहकरात सभा घेणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.

 यावेळी  बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरेंनी फोटोसेशनही केले. उद्धव ठाकरेंची मेहकरात होणारी सभा अतिविराट करण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे.