हजारो सैनिक जमले, बुधवत बरसले, खेडेकर गरजले अन रहाटे जिंकले! मेहकरातील जंगी मेळाव्याने खासदारांचा गड हादरला!!

तुफानी गर्दीने आशिष रहाटेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब! बोक्यांनी बिळ उध्वस्त केल्याने आम्ही मोकळे; खेडेकरांची जहाल टिका!
 
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मतदारसंघाचा केंद्रबिंदू असलेल्या मेहकरात खासदार जाधवांच्या विरोधात रणशिंग फुंकून हजारोंचा  दणदणीत , खणखणीत, जंगी मेळावा घेण्याचे आव्हान गत चाळीसेक वर्षात कोणताही  प्रस्थापित पक्ष, नेता घेऊ शकला नाही,  ते शिवधनुष्य पेलण्याचे अन जंगी मेळावा घेण्याची  ऐतिहासिक कामगिरी नव्हे राजकीय चमत्कार आज स्व. दिलीपराव रहाटे या नरसिंहाच्या  छाव्याने अर्थात आशिष रहाटे यांनी करून दाखविला!  यामुळे आज जमलेल्या हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने त्यांच्या नेतृत्वावर, आज , ९ ऑगस्टच्या  मुहूर्तावर शिक्कामोर्तब झाले! क्रांती दिनाच्या मुहूर्तावर मेहकर मतदारसंघात एका नवीन राजकीय क्रांतीचे रणशिंग फुंकण्यात आले असतानाच खासदारांच्या गडाला ५ हजार रिष्टर स्केल च्या भूकंपाने हादरविले..

या बातमीचे हेडिंग म्हणजे या मेळाव्याचे वास्तव चित्रण , वर्णन ठरावे! आशिष रहाटे यांचे भावनिक परंतु परखड प्रास्ताविक, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचे बरसणारे आणि नरेंद्र खेडेकर यांचे ' टायगर अभि जिंदा  है'  हे जाणवून देणारे रोखठोक भाषण मेळाव्याचा कळस ठरला.

शिंदेशाहीत सामील झाल्यावर खासदारांनी ज्या मेहकर जंगी  बैठक घेतली त्याच मेहकरतील  वृंदावन लॉन्स मध्ये आज दुपारी हा मेळावा पार पडला. मात्र आजची गर्दी' त्या' गर्दी पेक्षा तसूभरही कमी नव्हती हे टीकाकारांनी देखील कबूल केले. यावेळी आशिष  रहाटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  माझ्या वडिलांच्या पुण्याईने जिल्ह्याभरात शिवसेना उभी राहिली. मी त्यांचा पुत्र हे माझे भाग्य! कोणत्याही पदाची अभिलाषां न ठेवता मी शिवसेनेचे काम करत राहणार असून धर्मवीरांच्या  शिवसेनेसोबत गद्दारी करण्याचा विचारही करू शकत  नाही. 

२० हजारांचा ड्रेस अन ५ हजाराचा गॉगल असा शेतकरी कधी नाय पायला...

जालिंदर बुधवत म्हणाले की  कितीही गेले तरी शिवसेना पक्ष कधीही संपणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहे. शिवसेनेमुळेच मला पदे मिळालीत. त्यामुळे मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही असे भावनिक उदगार त्यांनी काढले. नरेंद्र खेडेकर यांनी आपल्या भाषणातून स्थानिक आमदार व खासदार जाधवांवर टीकेची  तोफ डागत त्यांची खिल्ली उडविली . उद्धव ठाकरे भेटत नाही असे म्हणणाऱ्यांनी मातोश्री वरून दहाएक वेळा एबी फॉर्म आणले. ते आम्हाला बीळातले उंदीर असे म्हणतात, आता काय सांगावे , बिळा  बाहेर बोके  होते. त्यामुळे आम्ही बिळातच  होतो. आता बोक्यांनीच बिळ उध्वस्त  केले. त्यामुळे आम्ही मोकळे झालोत असा खणखणीत टोला नरेंद्र खेडेकरांनी लगावला. मध्यंतरी शिवसेनेच्या नेत्यांच्या त्रासापोटीत काँग्रेसमध्ये गेल्याची त्यांनी प्रामाणिकपणे कबुली दिली. प्रस्थापित  नेत्यांच्या धमकीला बळी न जाता छाती ठोकपणे आपणा सर्वांच्या मदतीने  शिवसेना उभी करणार असून  आशिष रहाटे हे  भावी आमदार होणार  असे त्यांनी सांगताच सभास्थळ टाळ्यांच्या कडकडाट ने गुंजले! यावेळी त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधत,  भूमिपुत्र,  दहा हजार रुपायांचा चष्मा लावून वीस हजाराचा ड्रेस घालून ट्रॅक्टर चालवून पेरणी करत नसतो. असा खोचक टोला दिला.

यावेळी देवानंद निकम असलम खान पठाण. माजी जिल्हा परिषद सदस्य किसना पाटील. पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पाडव . विभाग प्रमुख नितीन देशमुख. शाम काळे. श्याम निकम हे उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य कैलास चवरे, अंगणवाडी निवड समितीचे माजी अध्यक्ष  तथा काँग्रेसचे प्राध्यापक गणेश बोचरे .युवक काँग्रेसचे रवी मिस्कीन यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी जानेफळ नायगाव देशमुख. नायगाव दत्तापूर. उटी .निंबा .गोमेधर . वरवंड  . घाटनांद्रा . फरदापुर. पिंपळगाव उंडा. कल्याण व इतर बऱ्याच गावचे सरपंच उपसरपंच सदस्य. तरुण मंडळी गावकरी उपस्थित होते.  संचलन किशोर रहाटे केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रहाटे नावाचा अस्सल भगवं वादळ तयार झालं एवढं मात्र निश्चित !