अमरावती जिल्ह्यातल्या वरूड येथील पदवीधरांच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या धिरज लिंगाडेंना विजयी करण्याचा पदवीधरांचा निर्धार! मेळाव्याला भरगच्च उपस्थिती
१२ वर्षात पदवीधरांनी अतिशय निष्क्रिय आमदार बघितला. पदवीधरांच्या प्रश्नांचे त्यांना काहीच देणे घेणे नाही. आता पुन्हा आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी खोटे आश्वासने देणे सुरू केले आहे. मात्र सुज्ञ पदवीधर मतदारांनी आता भाजप उमेदवाराचा कावा ओळखला आहे. त्यामुळे पदवीधर मतदार आता धिरज लिंगाडे यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन सभागृहात पाठविणार असल्याचा विश्वास अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांनी व्यक्त केला.
पदवीधरांचा विश्वास सार्थ ठरवेल: धिरज लिंगाडेंचा शब्द..!
मी जिथे जिथे जातोय त्या त्या ठिकाणी पदवीधर उस्फूर्त पाठिंबा देत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील पदवीधर महाविकास आघाडीच्या सोबत आहेत. १२ वर्षात पदवीधरांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली नाही, सध्याच्या आमदारांना त्यासाठीच वेळ मिळत नव्हता असे यावेळी बोलतांना लिंगाडे म्हणाले. पदवीधर मतदार माझ्यावर जो विश्वास दाखवत आहे तो सार्थ ठरवेल असेही यावेळी लिंगाडे म्हणाले. मंचावर दर्यापूर चे आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे,प्रमोद कोहळे पाटील, विजय निकम, यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.