द काश्मीर फाईल चित्रपट राज्यात करमुक्त करा; "भाजयुमो'चे बुलडाण्यातून सीएमना निवेदन!
Mar 16, 2022, 20:50 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः द काश्मीर फाईल हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा, या मागणीसाठी आज, १६ मार्चला दुपारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
द काश्मीर फाईल हा चित्रपट महाराष्ट्रातील अधिकाधिक जनतेला पाहता यावा यासाठी तो लवकर करमुक्त करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख पद्मनाभ बाहेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे, मंदार बाहेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप उगले पाटील व विनायक भाग्यवंत, अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, बुलडाणा नगरपालिका गटनेते अरविंद होंडे, युवा मोर्चा जिल्हा सचिव दत्ता शेवाळे, शहर सरचिटणीस अनंत शिंदे, युवा मोर्चा तालुका संपर्कप्रमुख सोपान जगताप, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतीश पाटील व यश तायडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर, अमोल जाधव, गजानन सपकाळ, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख अभिषेक वायकोस आदी उपस्थित होते.