बुलडाणा लाइव्हच्या "त्या" बातमीवर देऊळगावराजा तालुक्याचे शिंदेगटाचे तालुका प्रमुख संतप्त! म्हणाले ,हे विरोधकांचे खोडसाळपणाचे राजकारण! आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यात शिंदेगटाचा फ्लॉप- शो या मथळयाखाली बुलडाणा लाइव्ह वर काल, २७  सप्टेंबरला वृत प्रकाशित होते. दरम्यान हे वृत्त म्हणजे विरोधकांचे खोडसाळपणाचे राजकारण असून आपल्यावरील आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा शिवसेनेचे( शिंदे गट) तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी केला आहे.

माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचा वाढता पाठिंबा पाहून खोडसाळपणाचे राजकारण करणाऱ्या माथेफिरुंच्या झोपा उडाल्या आहेत.  बिन बुडाचे आरोप करून ती बातमी सुद्धा त्यांनीच लावली असून विरोध करायचा असेल तर समोर येऊन करा ,दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका असेही चित्ते  यांनी म्हटले आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख झाल्यानंतर समस्त गावकऱ्यांनी माझी जंगी मिरवणूक  काढली, त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. गावातील विरोध आता मावळला असून संपूर्ण गाव एका ठिकाणी आल्यामुळे तालुक्यातील काही बनावट नेत्यांचे पोट दुखत असल्याने ते त्यांचे बनावट डाव मांडून पाहत आहे असा आरोप अनिल चित्ते यांनी केला आहे. कारण त्यांना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या आहेत. 
   
 कुणाला आमदार व्हायचे आहे, कुणाला खासदार व्हायचे आहे  मात्र शशिकांत खेडेकर यांच्यावर आरोप करून तुम्ही कधीच मोठे होणार नाही. उलट सूर्यावर थुंकल्यावर थुंकी स्वतःच्या तोंडावर पडतो हे विसरू नका असेही अनिल चित्ते यांनी म्हटले आहे.मतदार संघात आमदार नसतांना सुद्धा निधी आणण्याचे काम ते करीत आहेत. शिशिकांत खेडेकर यांच्या मागे कोण आहे कोण नाही हे येणाऱ्या काळातच कळेलच असेही अनिल चित्ते यांनी म्हटले आहे.खेडेकर साहेबांना राजकारण शिकवू नको तुला हौस असेल तर पत्रकारिता सोडून खुशाल राजकारण कर असे आवाहनही अनिल चित्ते यांनी संबधित पत्रकाराला दिले आहे.