काँग्रेस नेते कुणाल बोंद्रेंची अशीही संवेदनशीलता.! म्हणाले, चिखलीवासियांवर संकट असतांना जन्मदिवस साजरा करणे योग्य वाटत नाही;
नगर परिषद प्रशासनाच्या अतिक्रमण हटविण्याच्या निर्दयी कारवाई विरुद्ध आयोजित धडक मोर्चात सहभागी होण्याचे केले आवाहन
भाजपच्या प्रदेश पातळीवरील मोठ्या नेत्याला पराभूत करून चिखलीच्या राजकारणात दमदार एन्ट्री करणाऱ्या कुणाल बोंद्रे यांनी उपनगराध्यक्षपदाची कारकीर्द विकासकामांनी चांगलीच गाजवली होती. याचाच परिणाम म्हणून त्यानंतर कुणाल बोंद्रे यांच्या अर्धांगिनी सौ.प्रियाताई कुणाल बोंद्रे याही थेट जनतेतून नगराध्यक्ष झाल्या होत्या. दरम्यान, आपल्या कार्यकाळात चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आपण परिश्रम घेतले. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन शेकडो कोटींची विकास कामे केली. मात्र आता चिखलीच्या विकासात महत्वाचा वाटा असलेल्या सर्वसामान्य जनतेची हेळसांड करण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे.
लहान मोठा व्यवसाय करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांना त्यांची दुकाने, घरे हटविण्याच्या नोटिसा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. घर उभे करण्यासाठी सामान्य माणसाचे अख्खे आयुष्य खर्ची होते मात्र हे घर पाडतांना निर्दयी प्रशासनाला काहीच कसे वाटत नाही असा सवालही कुणाल बोंद्रे यांनी केला आहे. चिखली वासियांवर हे संकट असल्याने आपण आपला जन्मदिवस साजरा करणार नाही. आज, ५ डिसेंबरला काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निर्दयी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळ्याजवळून निघणाऱ्या या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा,याच माझ्यासाठी आपल्या शुभेच्छा असतील असेही कुणाल बोंद्रे यांनी म्हटले आहे.