जिल्हा काँग्रेस कमिटीकडून देवानंद पवार यांचा विशेष सन्मान! कारणही खासच..
Updated: Aug 17, 2022, 13:39 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसने काढलेल्या आजादी गौरव यात्रेचा जिल्हास्तरीय समारोप कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी, बुलडाणा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे मेहकर तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांचा सन्मान करण्यात आला.
९ ऑगस्ट म्हणजेच क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन यादरम्यान काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मेहकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांच्यावर होती. मेहकर तालुक्यात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांचे सूक्ष्म नियोजनामुळे या पदयात्रेत मोठ्या संख्येने सामान्य जनता आणि काँग्रेस कार्यकर्ते उस्फुर्तपणे सहभागी झाले.
जिल्ह्यातील सर्वात पहिला अहवाल सुद्धा देवानंद पवार यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द केला. त्यामुळे देवानंद पवार यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी देवानंद पवार यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हाभरातील काँग्रेस नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.