...म्‍हणून सतीश गुप्त म्‍हणाले, वाढदिवस साजरा करूच नये असे वाटते!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजकालच्या तरुण पिढीत साजरे होणारे वाढदिवस पाहून वाढदिवसच साजरा करू नये असे वाटते. कारण धांगडधिंगा, रस्त्यावर केक कापून गोंधळ घालण्याचा ट्रेंड युवा पिढीत सुरू झाला आहे. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो याचेही भान त्‍यांना राहत नाही. मात्र आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी गर्भपिशवीमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबिरासारखा सेवाभावी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्‌गार भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी काढले.

 

mahale mam

आधार बहुद्देशीय संस्था, भारतीय सिंधू सभा, चिखली मेडिकल असोसिएशन व तोरणा महिला सहकारी बँकेच्या सहकार्याने २७, २८ व २९ मार्चला आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहरातील  ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मुकुल वासनिक सांस्कृतिक भवनात गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या पहिल्या दिवशी चिखली तालुक्यातील ५९३ मुली व महिलांना लस देण्यात आली. शिबिराला महिलांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विदर्भात पहिल्यांदाच असे शिबिर घेण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सौ. महाले पाटील म्‍हणाल्या, की महिलांत छातीचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगाचे लवकर निदान न झाल्याने किंवा महिलांनी झालेला आजार अंगावर काढल्याने हा आजार बळावत जातो. पर्यायाने या आजाराने ग्रस्त महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हा आजार कोणत्याही वयात होत असल्याने कमी वयात महिलांचे मृत्यू होत आहेत. गर्भाशय हा महिलांना अपत्य निर्मितीसाठी निसर्गाने दिलेले वरदान असले तरी स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे हेच वरदान मरणाच्या दारात घेऊन जात असल्याने हेच वरदान शाप ठरत आहे.

पुरुषांमध्ये तंबाखू, सिगारेट व इतर व्यसनांनी कॅन्सर होतो. महिलांना कोणतेही व्यसन नाही तरीसुद्धा त्यांना कॅन्सर होत आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर लस निघालेली आहे आणि या लसीने कॅन्सरवर मात करता येत असल्याने महिलांना कॅन्सरमुक्त करण्याचे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. वारंवार असे लसीकरण शिबिर घेणार असल्याचेही आमदार सौ. महाले पाटील म्‍हणाल्या. शिबिरासाठी २ हजार ६७० मुली व महिलांनी नोंदणी केलेली आहे. पहिल्या दिवशी ५९३ मुली व महिलांना लस देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. संध्या कोठारी यांनी केले.

आभार डॉ. भारती गुरुदासानी यांनी मानले. व्यासपीठावर डॉ. प्रतापसिंह राजपूत, रामदास देव्हडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, भाजप अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख अनिस, सौ. सिंधूताई तायडे, सौ. वजिराबी अनिस शेख, सौ. शमशादबी पटेल, श्रीमती सुनंदाताई शिनगारे, सौ. विमलताई देव्हडे, सौ. मनीषाताई सपकाळ,  सौ. ममताताई बाहेती, सौ. अर्चनाताई खबुतरे, सौ. निताताई सोळंकी, प्रा. विरेंद्र वानखेडे, सौ. मंगलाताई झगडे, सौ. रेवतीताई कुलकर्णी, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विजय नकवाल, अनुप महाजन, सचिन कोकाटे, युवराज भुसारी, महेश लोणकर, श्याम वाकदकर, सागर पुरोहित, संतोष काळे, अनमोल ढोरे पाटील, सिध्देश्वर ठेंग, सलीम परवेज, संदीप लोखंडे, डॉ. उदय राजपूत, डॉ. पडघान, अक्षय भालेराव, सागर पवार, राजेश सोनार, भावना शर्मा, सौ. खुशी भोजवाणी, श्रीमती शोभा गुरूदासानी, सौ. दुर्गा मुलचंदाणी, श्रीमती लक्ष्मी मुलचंदाणी, जिनल भोजवाणी, कविता भोजवानी, ज्योती गोलाणी, माया गोलाणी, हेमा गुरूदासानी, अजाबराव वसू, सौ. स्मिता दळवी, डॉ. काळूसे, डॉ. राखी लध्दड, डॉ. अमित पडघान यांची उपस्थिती होती.