गळ्यातील मंगळसूत्र दाखवत हेमा मालिनी श्वेताताईंना म्हणाल्या...
काल, ७ एप्रिल संसद भवन परिसरात श्वेताताई महाले व महाराष्ट्रातील महिला आमदारांनी हेमा मालिनी यांची भेट घेतली. यावेळी हेमा मालिनी यांनी महाराष्ट्रातील महिला आमदारांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर त्या निघत असतांना तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र खुप छान आहे असे आमदार श्वेताताई हेमा मालिनी यांना म्हणाल्या. यावर हेमा मालिनी यांनी थांबून गळ्यातील मंगळसूत्र श्वेताताईंना दाखवले. हे मंगळसूत्र जावयाने गिफ्ट दिल्याचे त्यांनी सांगितले. गळ्यातील मंगळसूत्र हे भगवान श्रीनाथजींचे प्रतिक असल्याने हेमा मालिनी यांनी सांगितले.
दरम्यान ७४ वर्षीय हेमा मालिनी सध्या उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. १५० पेक्षा अधिक चित्रपटात काम करणाऱ्या हेमा मालिनी यांचे १९८१ मध्ये अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी लग्न झाले. २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. याआधी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आजही त्यांना ड्रीम गर्ल या नावाने ओळखले जाते.