शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट लावण्यासाठी सुषमा अंधारेना तिकडे पाठवले! आमदार संजय गायकवाडांची टीका..!!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचा कार्यक्रम करीत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अधिवेशनातील निलंबनाच्या विषयी विचारले असता, आमदार गायकवाड यांनी राष्ट्रवादी बद्दल आपले मत मांडले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कडून शिवसेना ची वाट लावण्याची मोहीम सुरू आहे. राष्ट्रवादी शिवसेनेसमोर ढाल बनून उभी आहे. काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते. तेव्हा अजित पवार यांनी त्या नगरसेवकांना परत पाठविले होते. दरम्यान दोघांमध्ये एकमेकांचे पदाधिकारी आपापल्या पक्षात घ्यायचे नाही. असा करार झाला होता. तरीदेखील राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अंधारे यांना उर्वरित शिवसेना संपविण्यासाठी शिवसेनेत पाठविले असल्याचे आमदार गायकवाड म्हणाले.