८ पालिकांच्या आरक्षणावर २९ जूनला शिक्का मोर्तब! २१ पर्यंत दाखल करता येईल हरकती

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाने आज जिल्ह्यातील ८  नगरपरिषदांचे ओबीसी वगळून प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. ८ पालिकांच्या सभागृहात आरक्षण  सोडत पार पडली.

जिल्ह्यातील बुलडाणा, मेहकर, मलकापूर, खामगाव, नांदुरा, शेगाव ,जळगाव जामोद, देऊळगाव राजा व चिखली या ९ पालिकांची मुदत ३ जानेवारी २०२२ रोजीच संपली आहे.   हद्दवाढ मंजूर झाल्याने चिखली वगळता ८ पालिकांची प्रभाग रचना अंतिम व प्रसिध्द करण्यात आली.  आजच्या लॉटरीमध्ये  अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण मधील महिलांची सोडत काढण्यात येईल.  

सोडत प्रसिद्ध करण्यात आल्यावर १५ते २१ जून दरम्यान  जिल्हाधिकारी यांच्याकडे  हरकती व सूचना सादर करता येईल. याचा अहवाल  जिल्हाधिकारी २४ पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करणार असून २९ पर्यंत आयुक्त आरक्षणास मान्यता देतील, असे नगर प्रसाशन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.