विकासकामांचा झंझावात! आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते इसरूळ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज चिखली तालुक्यातील इसरूळ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. विकासकामांसाठी येणाऱ्या अडचणी  तुम्ही बिनधास्त  सांगा. आपण  परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा शब्द यावेळी ग्रामस्थांना डॉ. शिंगणे यांनी दिला.

इसरूळ येथील श्रीकृष्ण मंदिर येथे स्थानिक विकास निधी मधून १४ लक्ष रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार डॉ.शिंगणे यांनी केले. याशिवाय गावातील मारुती मंदिर परिसरात जनसुविधा योजनेअंतर्गत ५ लक्ष रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक चे लोकार्पण सुद्धा त्यांनी केले. तसेच २५/१५ योजनेतून २० लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या शादीखाना बांधकामाला भेट देत कामाची पाहणी डॉ. शिंगणे यांनी केली. यावेळी इसरुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.