आता हे काय नवीन..? आमदार संजय गायकवाडांना देवीचा साक्षात्कार! देवी गायकवाडांना म्हणाली...
जाहिरात☝️
त्याचे झाले असे की आमदार गायकवाड काल, २५ नोव्हेंबरला रात्री खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेहकरात आले होते. तिथे पत्रकारांनी त्यांना गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामाख्या देवीला दर्शनासाठी जाणार आहात का ? असा प्रश्न केला. त्यावर आमदार गायकवाड म्हणाले, मी देवीच्या दर्शनासाठी जाणार होते. माझे तिकीटही फायनल झाले होते. देवीला बळी देण्यासाठी ९ हजार रुपये देवून संजय राऊत नावाचा एक बोकड सुद्धा विकत घेतला होता. मात्र देवीचा मला साक्षात्कार झाला. "हा भोग मी स्वीकारणार नाही. जर तो स्विकारला तर तो स्वर्गात जाईन त्याची जागा नरकात आहे" असे देवी मला म्हणाली असा दावा आ. गायकवाडांनी केला. त्यामुळेच मी कामाख्या देवीला जाणार नाही असे आ.गायकवाड म्हणाले.
खा. प्रतापराव जाधव जाणार...
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना व खासदारांना सहकुटुंब घेऊन गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. राज्यात सरकार स्थापन झाल्यावर दर्शनाला येईल असा नवस मुख्यमंत्र्यांनी देवीला केला होता. त्यासाठी एक विशेष विमान सुद्धा बुक करण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव यांनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले.