शेगावात 'ज्युनिअर पवारांनी' डागले क्षेपणास्त्र! म्हणाले मोहित कंबोज यांनी बँकेचे ५२ कोटी बुडविले!!
हा पराक्रम केलाय राष्ट्रवादी चे तरुण तुर्क आमदार रोहित पवार यांनी ! दर्शनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी कंबोज यांनी कालपरवा केलेले ४ ट्विट अदखलपात्र आहेत. त्यांनी हा उपद्व्याप केल्यावर आपण त्यांची माहिती घेतल्यावर धक्का दायक बाबी सामोरे आल्या. ओव्हरसिज बँकेचे अर्थात जनतेचे ५२ कोटी रुपये बुडविले अशी चर्चा आहे. याशिवाय इतर दोन ,तीन बँकांना त्यांनी गंडा घातल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट किती गंभीरतेने घ्यावे हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
जास्त भरती केल्याने शिंदे गटात अनेकजण गुदमरत आहे..!
यावेळी ते पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टातील निर्णय पुढे ढकलून चालणार नाही. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचिकांवरील निकाल पुढे ढकलून चालणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकशाहीला आणि संविधानाला धरून निर्णय असला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी बोलून दाखविली. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी शिंदे गटाची खिल्ली उडविली. जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये सुरुवातीपासून होते, त्यांना काहीही मिळालं नाही. मात्र उशिरा गेलेल्यांना मंत्रिपदं मिळाली. जास्त भरती केल्याने लोक गुदमरूत आहेत, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.