मंत्री एकनाथ शिंदे उद्या मेहकरमध्ये
Mar 28, 2022, 22:08 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे उद्या, २९ मार्चला बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः २९ मार्चला दुपारी दोन वाजता समृद्धी महामार्गानजिक फर्दापूर (ता. मेहकर) येथील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने मेहकरकडे प्रयाण, दुपारी अडीचला आकाशवाणी टॉवर, रामनगर, मेहकर येथे आगमन, चि. अभिषेक व चि. सौ. कां. डॉ. नयन यांच्या शुभ विवाहास उपस्थिती, दुपारी तीनला मेहकर येथून फर्दापूरकडे मोटारीने प्रयाण, दुपारी साडेतीनला फर्दापूर येथे आगमन व हेलिपॅडवरून खासगी हेलिकॉप्टरने ठाण्याकडे प्रयाण करतील.