पालकमंत्र्यांच्या रणांगणातील 'अष्टवीर' जैसे थे.. ! राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला इतर पक्ष आव्हान देणार काय? वाचा कसा होणारा जिल्हा परिषदेचा रणसंग्राम!
देऊळगाव राजा तालुक्यात देऊळगाव मही, सिनगाव व सावखेड भोई हे ३ तर मातृतीर्थातील साखरखेर्डा, शेंदुर्जन, दुसरबीड, किनगाव राजा, सोनोशी हे गट नॉट आऊट राहिले आहे. आज प्रसिद्ध झालेल्या रचनेनुसार , देऊळगाव मही गटात त्यासह बायगाव खुर्द, चिंचखेड, डोड्रा, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, अंढेरा, सेवानगर, शिवणी आरमाळ, बायगाव बुद्रुक, मेडगाव, खडका , पिंप्री आंधळे, धोत्रा नंदई ही गावे समाविष्ट आहे.
सिनगाव गटात दिग्रस बुद्रुक व खुर्द, टाकरखेड वायाळ, निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, नारायण खेड, सरंबा, सुरा, नागनगाव, पाडळी शिंदे, सावखेड नागरे, सिनगाव जहांगीर, गारगुंडी, खल्याळ गव्हाण, सुल्तानपूर, मंडपगाव, गारखेड, मेहुणाराजा, दगडवाडी, रोहना, टाकरखेड भागिले ही गावे समाविष्ट आहे. सावखेड जिल्हा परिषद गटात सावखेड भोई, भिवंगाव बुद्रुक व खुर्द, जुमडा, गिरोली बुद्रुक व खुर्द, अंभोरा, जांभोरा, कुंभारी, पिंपळगाव राजे (चीलमखा),किन्ही पवार, पांगरी, डोईफोडेवाडी, जवळखेड, उंबरखेड, आळंद, पिंपळगाव बुद्रुक, गोंधनखेड, चिंचोली बुद्रुक, बामखेड, असोला जहांगीर, पळसखेड झाल्टा , बोराखेडी, बावरा, पळसखेड मलकदेव ,तुळजापूर व गोळेगाव ही गावे समाविष्ट आहे.
मातृतीर्थ तालुका
साखरखेर्डा गटात निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, तडेगाव, केशव शिवणी, वाकड जहांगीर, वाघृल, खैरव, बारलिंगा, ढोरवी, पोफळ शिवणी, वाघाळा, हनवतखेड, हिवरा गडलिंग, नागझरी, दरेंगाव, पिपळगाव सोनारा ही गावे आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे गाव असलेल्या शेदुर्जन जिल्हा परिषद गटात शिंदी, रताळी, मोहाडी, सवडद, गुंज, सावंगी भगत, गुंज माथा, एकाबा, वरुडी, शेवगाव जहांगीर ,उमनगाव, गोरेगाव, बाळसमुद्र, तांदुळवाडी, रामनगर, शेंदुर्जन, काटे पांगरी, लिंगा, शिवणी कांकळ, सायाळा, राजेगाव, जागदारी, आंबेवाडी, भंडारी, कंडारी या गावांचा समावेश आहे.
दुसरबीड गटात देऊळगाव कोळ, कोणती, कुंबेफळ, आगेफळ, झोटिंगा, मलकापूर पांगरा, वरदडी खुर्द, दुसरबीड, जऊळका, पिंपळगाव कुंडा, लिंगा, ताडशिवणी, राहेरी बुद्रुक या गावांचा समावेश आहे. किनगाव राजा गटात किनगाव राजा, राहेरी खुर्द, विझोरा, साठेगाव, शेलगाव राऊत, पिंपळगाव लेंडी, उमरद, सारखेड, पळसखेड चक्का, जळगाव, पिंपळगाव खुंटा, उगला, सावखेड तेजन, हनवतखेड, महारखेड, तांदुळवाडी, बोराखेडी जलाल, पांगरखेड, खामगाव, शिवणी टाका, सावरगाव माळ, निमखेड, नशिराबाद, दरेंगाव, अंचली, नाईक नगर, डावरगाव, वसंत नगर ही गावे समाविष्ट आहे. सोनोशी गटात दत्तापुर, धांदरवादी, भोसा, शेलू, वाघोरा, सुलजगाव, पिंपरखेड खुर्द, वडाळी, अडगावराजा, गारखेड, चिंचोली जहागीर, पांगरी उगले, जयपूर, पिंपरखेड बुद्रुक, शिरनेर , वरदडी बुद्रुक, बोराखेडी खुर्द, जांभोरा, देवखेड, सोनोशी, रुम्हणा, तांदुळवाडी, सायंदेव, खैरखेड, धानोरा, बुटा, निमखेड कसबा, चांगेफल बोराखेडी बुद्रुक( गंडे) ही गावे समाविष्ठ आहे.