माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. ज्योतीताईंनी हाती बांधले घड्याळ! अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  केळवद जिल्हा परिषद सर्कलच्या माजी सदस्या डॉ ज्योतीताई शिवशंकर खेडेकर यांनी आज, १२ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.


   मुंबई येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांनी हातावर घड्याळ बांधले. यावेळी त्यांच्यासमवेत अमोल खेडेकर यांनीसुद्धा प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.