कोविडमुळे पुन्हा जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला! मनोरुग्णांचे केले कोरोना लसीकरण

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोरोना म्हणून आरोग्यमंत्र्यांनी सर्वच जिल्हा आरोग्यांना दक्षतेच्या आदेश दिल्यावर  आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.आज आरोग्य विभाग बुलडाणा व वाय.आर.जी.केअर, यु.एस.आय.डी., जे.एस.आय., एम - राईट प्रोजेक्ट द्वारा दिव्या फौंडेशन वरवंट येथे २३ डिसेंबर रोजी अनाथ व बेघर  मनोरुग्ण लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.

 मनोरुग्ण लोकांजवळ कोणतेही कागदपत्र नसल्याकारणाने एकाच आधार कार्ड व एकाच मोबाईल नंबर वर त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले, आणि तेथील 50 लोकांचे लसीकरण करण्यात आले.लसीकरण सत्र यशस्वी होण्यासाठी दिव्या फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष अशोक काकडे आणि वाय. आर. जे केअर संस्थेचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.कोरोना लसीकरण कॅम्पला उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंट येथील कर्मचारी डॉक्टर गणेश गरकल (सी. एच. ओ) दिपाली राऊत (ए. एन. एम) आणि इतर काही कर्मचारी वर्ग व वाय.आर.जी.केअर संस्थेकडून नितीन डोंगरदिवे (जिल्हा प्रशासक समन्वयक) श्रीकांत बिलारी (स्टाफ ब्रदर्स ) आदि उपस्थित होते.