जिल्हावसियांनो नो टेन्शन! खासदार प्रतापराव जाधवांनी सांगितलं खामगाव जालना रेल्वेमार्गाच खर खर सत्य! रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंच्या "त्या" विधानाबद्दल म्हणाले...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या एका भाषणाची बुलडाणा जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली. खामगाव जालना रेल्वेमार्गासंबधी ना. दानवेंनी केलेल्या विधानाबद्दल बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज ,बुलडाणा येथे स्पष्टीकरण दिले. जिल्हावासियांनो कोणतेही काळजी करण्याची गरज नाही, खामगाव जालना रेल्वेमार्ग होणार म्हणजे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले. रावसाहेब दानवेंची  भाषणाची एक विशिष्ट शैली आहे, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. जालना जळगाव रेल्वेमार्ग हा स्वतंत्र विषय आहे,त्या विषयामुळे खामगाव जालना रेल्वेमार्गाच्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे खा.जाधव यांनी 'बुलडाणा लाइव्ह" शी केलेल्या चर्चेत स्पष्ट केले.

२००९ च्या आधी खामगाव जालना रेल्वेमार्गाची केवळ मागणी होती, मात्र आपण पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर संसदेत या मागणीला वाचा फोडल्याचे खा.जाधव यांनी सांगितले. खामगाव जालना रेल्वेमार्गाची अंतिम लाईन तयार झालेली आहे.त्यात कुठे कुठे रेल्वेस्टेशन होणार आहेत हेसुद्धा फायनल झाले आहे. एकूण १६ स्टेशन पैकी १२ स्टेशन बुलडाणा जिल्ह्यात तर ४ स्टेशन जालना जिल्ह्यात होणार असल्याचेही खा.जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी खा.जाधव यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गाचा संपूर्ण नकाशाच दाखवला. अंतिम डीपीआर आठ ते दहा दिवसांत रेल्वेबोर्डाकडे सादर केला जाईल. हा केवळ केंद्र सरकारचा विषय नसून राज्य सरकारला सुद्धा एकूण खर्चाचा ५० टक्के वाटा उचलावा लागणार आहे, त्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून याआधीच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केला असल्याचे खा.जाधव यांनी स्पष्ट केले.