२१ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात! जळगाव जामोद मध्ये घेणार संकल्प सभा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे फुंकणार रणशिंग?
अजितदादांच्या सभेने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी हातभार लागेल असेही डॉ. शिंगणे म्हणाले. रस्ता अनुशेष, लोणार सरोवर विकास, सिंदखेडराजा विकास आराखडा तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय यासारखे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले.
जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा हा दौरा महत्वाचा असणार आहे. या सभेला राष्ट्रवादीची बुलंद तोफ समजले जाणारे विधानपरिदेचे आमदार अमोल मिटकरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे नेते या संकल्प सभेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलल्या जात आहे.